जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग
विभागा विषयी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या जिल्हा स्तरावरील केंद्र शासन पुरस्कृत स्वायत्त संस्थेमार्फत मुख्यत्वे करून केंद्र शासनाने ग्रामीण विकासाबरोबरच दारिद्रयाचे निर्मुलनासाठी विविध रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये व्यक्तीगत लाभार्थीच्या योजनांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणेसाठी आवश्यक असणा-या सामाजिक मालकीच्या मत्ता निर्मितीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजन ग्रामीण इ. महत्वाच्या योजनांचा अंतर्भाव होतो. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडूनही या योजनांसाठी ठराविक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)
राज्यात राष्ट्रीय आजिविका अभियान राबविण्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात नोंदणीकृत संस्थेच्या स्वरुपात जुलै 2011 पासून झाली. अभियान 2019-2020 पासून सर्व जिल्हयांमध्ये Intensive पद्धतीने राबविण्यात येत आहे.
अभियान ‘उमेद’ - एक समर्पित आणि संवेदनशिल संस्था, जी ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब, वंचित व उपेक्षित कुटुंबासाठी सक्षम वातावरणाची निर्मिती करेल. हे उद्दीष्ट समावेशक, लोकशाही तत्वावरील आणि स्वयंचलित लोक संस्थांची उभारणी करुन विविध योजना आणि वित्तीय सेवांचा लाभ तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधीच्या निर्मितीद्वारे साध्य केले जाईल. ज्यामुळे गरिबांना सुरक्षित, सन्मानाचे आणि भरभराटीचे जीवन जगता येईल.
ग्रामीण दारिद्रयाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केलेली असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाचाची सुरुवात केली आहे. दारिद्रयाचे निर्मूलन करण्यासाठी ग्रामी गरिबांना एकत्र आणून, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे, सदर संस्थांमार्फत गरीबांना वित्ती सेवा पुरवणे, गरीबांची व त्यांच्या संस्थांची क्षमता व वृद्धी व कौशल्यवृद्धी करणे आणि शाश्वत उपजीवीकेची साधने उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्रयाच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे, हे अभियानाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
स्वयंसहायता गटांची Internal Lending Process वाढावी व गटांची Corpus वाढण्यासाठी फिरता निधी (Revolving Fund) देण्यात येतो. ह्या Fund मुळे अंतर्गत व्यवहारांना प्रोत्साहन मिळते व गटांची त्या Fund मुळे अंतर्गत व्यवहारांना प्रोत्साहन मिळते व गटांची त्या Fund वर ownership वाढते. नवीन व जुन्या गटांना Gradation नुसार किमान 10000/- ते 15000/- पर्यंत RF दिला जातो. 03 महिने पूर्ण झालेल्या गटाचे Gradation करुन RF वितरीत होतो.
स्वयंसहायता समूह अभियानाच्या पंचसूत्रीचे पालन करीत आहे. गटाचे अंतर्गत कर्ज वितरण व परतफेड नियमित आहे. RF चा उत्तम वापर गटाने केलेला आहे, गट जुना आहे, तसेच गटास बँकेचे कर्ज देऊन परतफेड व्यवस्थित झालेली आहे, पण त्यानंतर मोठे कर्ज आवश्यक आहे परंतु मिळाले नाही, अशा गटांचा Micro Investment Plan (MIP) करुन उपजीविका वृद्धींगत होणेसाठी CIF ची मदत देता येते. CIF प्रतिगटास मागणीनुसार रक्कम रु. 40000/- ते 60000/- मात्र वितरीत करता येतो.
सदर निधी किमान 03 महिने पूर्ण केलेल्या ग्रामसंघास मागणीनुसार वितरीत करण्यात येतो. ग्रामसंघामार्फत पडताळणी करुन प्रस्तावानुसार प्रति ग्रामसंघ रक्कम रु. 150000/- मात्र वितरीत करण्यात येतो. या निधीचा वापर ग्रामसंघामार्फत अत्यंत गरीब/गरजू जोखीम प्रवण कुटुंबे - विधवा, परितक्त्या, निराधार, कोव्हिड बाधित कुटुंबे, एकल महिला कुटुंबे, इ.च्या आरोग्य, शिक्षण, अन्नसुरक्षा, इ. गरजांची पूर्तता करण्यासाठी वितरीत केला जातो.
स्वयंसहायता गटास 06 महिने पूर्ण झाल्यावर गट बँक कर्ज घेणेस पात्र होतो.
प्रथम कर्ज - स्वयंसहाय्यता समूहाला ला 6 महिने पूर्ण झाल्यावर एकूण बचतीच्या कॉर्पसनुसार 6 ते 8 पट कर्ज किंवा कमीत कमी रु. 1.50/- लाख.
द्वितीय कर्ज - प्रथम कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर एकूण बचतीच्या कॉर्पसनुसार 8 पट कर्ज किंवाकमीत कमी रु. 3.00/- लाख,
तृतीय कर्ज - कर्जाची 90% परतफेड झाल्यावर कमीत कमी रु. 6.00 लाख
चतुर्थ कर्ज - कर्जाची 90% परतफेड झाल्यावर रु. 6.00 लाख पेक्षा जास्त
LokOS प्रणालीवरती अभियानातील सर्व समुदाय संस्थांची आणि त्यांच्या सभासदांची माहिती तसेच आर्थिक व्यवहारांच्या नोंदी घेण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रणाली म्हणजे LokOS. बचत कर्जवाटप, परतफेड, बंक किपिंग आणि इतर आर्थिक क्रियाकलाप विद्यमान NRLM/NRETP/इतर विभागासह अखंड इंटरफेस, अनुप्रयोग संबंधित सीबीओ आणि सदस्य त्यांचा डेटा ॲपवर पाहू शकतो.
वैयक्तिक व्यवसायामध्ये CMEGP, PMFME, मुद्रा, PMEGP इ. योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारणीसाठी स्वयं सहाय्यता समुहातील महिला सदस्यांना कर्ज पुरवठा केला जातो.
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
सेवाजेष्ठता सूची
Content Will Update Soon