शिक्षण विभाग
विभागा विषयी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इ.1 ली ते 7 वी च्या मुलांना व मुलींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते .जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात. इ.1 ली ते इ.7 वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत राबविल्या जातात.
शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलवरुन शासनाकडून भरणेत येतात. तसचे विस्तार अधिकारी (शिक्षण) संवर्गातील सरळसेवेची पदे शासनाच्या निर्देशानुसार भरली जातात.
पदोन्नतीची रिक्त पदे जिल्हा पदोन्नती समितीच्या मान्यतेने भरणेत येतात.
शिक्षण विभागातील शिक्षक व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांची विभागीय चौकशी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 चा नियम 06 च्या तरतुदीनुसार करणेत येते.
जिल्हांतर्गत नियतकालिक बदल्या हया शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन दरवर्षी केल्या जातात.
नोंदणी शाखेत दैनंदिन प्राप्त टपालाची ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये नोंदणी करुन पर्यवेक्षक कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या स्वाक्षरीने टपाल संबंधित कार्यासनांस वाटप केले जाते.
प्रत्येक महिन्यात कामाचा आढावा घेण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी यांची सभा घेतली जाते. तसेच कार्यालयीन स्टाफ यांचीही सभा घेऊन इतिवृत्त तयार केले जाते.
शिक्षण समितीच्या कामासंबधी तपशीलः- शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देणे व त्याची अंमलबजावणी बाबत पर्यवेक्षण करणे. विषय समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय :- वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या महत्त्वाच्या पत्रांची माहिती घेणे. सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमाचा आढावा घेणे. शालेय पोषण आहार बाबत आढावा घेणे. पगार, पेन्शन , बजेट, ऑडीट पॉइंट बाबत आढावा घेणे. जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता देणे. जि.प. प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने वर्गांना मान्यता देणे. शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मान्यता देणे इत्यादी कामकाज पाहिले जाते.
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
खर्च अहवाल
सेवाजेष्ठाता सूची
कागदपत्रे / नमुना आवेदन पत्रे (कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी)
अ.क्र. | तपशील | नमुना |
---|---|---|
1 |
आंतरजिल्हा बदली प्रस्ताव तपासणी सूची | |
2 |
गट विमा अंतिम अदायगी प्रस्ताव तपासणी सूची |
|
3 |
ठेव संलग्न प्रस्ताव तपासणी सूची |
|
5 |
प्राथमिक शिक्षक निवड श्रेणी मंजूर करणेबाबत तपासणी सूची |
|
6 |
भविष्य निर्वाह निधी अंतिम अदायगी वर्ग प्रस्ताव तपासणी सूची |
|
7 |
भविष्य निर्वाह निधी अंतिम अदायगी प्रस्ताव तपासणी सूची |
|
8 |
वरिष्ठ वेतनश्रेणी तपासणी सूची |
|
9 |
वैद्यकीय प्रतिकृती प्रस्ताव प्रशासकीय - तांत्रिक मंजुरीसाठी चेकलि |
|
10 |
शाळा इमारत निर्लेखनासाठी सादर करावयाच्या कागदपत्रांची चेक लिस्ट |
|
11 |
सेवा पुस्तक पडताळणी तपासणी सूची |
|
12 |
स्थायित्व प्रमाणपत्र प्रस्ताव तपासणी सूची |
योजना निहाय लाभ मिळालेल्या शाळा
अ.क्र. | योजनेचे नाव / उपक्रमाचे नाव | पहा |
---|---|---|
1 | 1ते 8. लॉकर पुरविण्यात आलेल्या शाळा | |
1 | 16 शाळांची यादी. आदर्श शाळा पायाभुत सुविधा निर्माण करणे | |
1 | 25 शाळांची यादी . विज्ञान प्रयोगशाळा संगणक शाळा निर्माण करणे | |
1 | 55शाळांची यादी रोबोटीक्स | |
1 | इस्रो सहलीमध्ये निवड झालेले विद्यार्थी सन २०२२-२३ | |
1 | इस्रो सहलीमध्ये निवड झालेले विद्यार्थी सन २०२3-२४/td> | |
1 | इसरो कर्मचारी व अधिकारी यादी 2024-25 | |
1 | इ.1ते 5 लॉकर पुरवठा करायची शाळांची यादी |