आरोग्य विभाग
विभागा विषयी
आरोग्य संस्थाद्वारे मिळणाऱ्या विविध सेवा
माता आणि बालकांचे आरोग्य :-
अ) प्रसुतीपूर्व काळजी :-
सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी (१२ आठवडयांचे आत) गरोदरपणात कमीत कमी पाच वेळा तपासणी :- पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबरच, दुसरी तपासणी (१२ आठवडेत) तिसरी तपासणी ४ ते ६ महिन्यांमध्ये (२६ आठवडे) चौथी तपासणी आठव्या महिन्यामध्ये (३२ आठवडे) तर पाचवी तपासणी ९ व्या महिन्यामध्ये (३६ आठवडे) सलग्न आवश्यक सेवा जसे सर्वसाधारण तपासणी, वजन, रक्तदाब, रक्तक्षयाकरिता तपासणी, पोटावरुन तपासणी, उंची, स्तनांची तपासणी, पहिल्या तिमाहीत फोलिक अॅसिडचे सेवन, १२ आठवडयानंतर लोह, फोलिक अॅसिड गोळ्यांचे सेवन, धर्नुवात प्रतिबंधक लसीची मात्रा, रक्तक्षयावरील उपचार इ. (आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनांनूसार) प्रयोगशाळेतील तपासण्या जसे हिमोग्लोबीन, लघवीतील प्रथिने व साखरेची तपासणी. जोखमीच्या गरोदर मातांचे निदान व तत्पर योग्य ठिकाणी संदर्भसेवा.
ब) प्रसुतीदरम्यान सेवा :-
आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यावर भर देणे. (प्रवृत्त करणे) स्वच्छतेच्या ५ नियमांचे पालन करुन प्रशिक्षित व्यक्तीकडून बाळंतपण करणे. तत्पर व योग्यठिकाणी संदर्भसेवा देणे.
क) प्रसुतीपश्चात सेवा :-
प्रसुतीपश्चात कमीत कमी २ वेळा गहभेटी देणे. पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत तर दुसरी ७ ते १० दिवसांच्या दरम्यान गहभेट देणे. मूल कमी वजनाचे असल्यास ४८ तासांच्या आत तसेच ७,१४,२१ व २८ दिवसात अशा पाच भेटी द्याव्यात. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. सल्ला व समुपदेशन :- आहार व विश्रांती, स्वच्छता, गर्भनिरोधन, नवजात बालकाची काळजी, अर्भक व मुलांचा आहार तसेच लैगिक आजार, एच.आय.व्ही.एड्स इ.बाबत.
क) प्रसुतीपश्चात काळजी :-
उपकेंद्गाच्या कर्मचार्यामार्फत कमीत कमी २ प्रसुतीपश्चात गृहभेटी :- पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत व दुसरी प्रसुतीनंतर ७ दिवसांच्या आत. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. आहार, स्वच्छता, कुटूंबनियोजनाबाबत आरोग्य शिक्षण देणे.
ड) बालकाचे आरोग्यः-
- नवजात अर्भकाची काळजी
- ६ महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान देणे.
- सर्व अर्भकांचे व मुलांचे लसीकरणाने टाळता येणार्या आजारांविरुध्द लसीकरण करणे.
- ५ वर्षापर्यंत सहा-सहा महिन्यांनी अ जिवनसत्वे ९ डोस देणे.
- बालकांमधील कुपोषण आणि आजारांचे प्रतिबंधन व उपचार करणे.
बालकांची काळजी :-
- अ) नवजात अर्भकाची काळजी :-
- नवजात अर्भकासाठी सोयी व तज्ञसेवा
नवजात अर्भकामधील तापमान कमी होण व कावीळ आजाराचे व्यवस्थापन.
- ब) बालकाची काळजीः-
- नवजात शिशु व बालकांमधील आजारांच्या एकात्मिक व्यवस्थापनासह ( IMNCI ) आजारी बालकांची तातडीची काळजी.
- बालकांमधील नेहमीच्या आजारांची काळजी.
- जन्मानंतर पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानास प्रवत्त करणे.
- लसीकरणाने टाळता येणार्या आजारांविरुध्द मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अर्भकांचे व बालकांचे संपूर्ण लसीकरण करणे.
- अ जीवनसत्त्वाचे प्रतिबंधात्मक डोस देणे.
कुपोषण, जंतूसंसर्ग यांसारख्या बालकांमधील आजारांचे प्रतिबंधन व नियंत्रण इ.
- कुटूंबनियोजन आणि गर्भनिरोधन :-
कुटूंबकल्याणाची योग्य ती पध्दत वापरण्यासाठी, आरोग्य शिक्षण देणे, प्रवत्त करणे व समुपदेशन करणे. कुटूंबनियोजनाच्या साधनांची उपलब्धता - निरोध, तांबी, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या, तात्काळ गर्भनिरोधन इ. कुटूंबकल्याणाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबणार्या योग्य जोडप्यांसाठी पाठपुराव्याच्या सेवा. आवश्यकतेनुसार सुरक्षित गर्भपातासाठी समुपदेशन व योग्य प्रकारे संदर्भसेवा.
- पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :-
आरोग्य शिक्षण, समुपदेशन व संदर्भसेवा शालेय आरोग्य सेवेसाठी मदत
- उपचारात्मक सेवा :-
किरकोळ आजारावर औषधोपचार उदा.ताप, अतिसार, श्वसनसंस्थेचे आजार, जंताचे विकार, अपघात व तात्कालिक परिस्थितीत करावयाचे प्रथमोपचार. तत्पर व योग्य संदर्भसेवा. प्राथमिक आरोग्य केंद्गाचे वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, पंचायत राज संस्था, स्वयंसहाय्यता गट यांच्या मदतीने अंगणवाडीमध्ये कमीतकमी दरमहा एक आरोग्य दिवस आयोजित करणे.
- जीवनविषयक घटनांची नोंद:-
जन्म - मृत्यू, मातामृत्यू , अर्भकमृत्यू यांसारख्या जीवनविषयक आकडेवारीची (घटनांची) नोंद घेणे व अहवाल पाठविणे (२१ दिवसांचे आत)
प्राथमिक आरोग्य केंद्ग
- अ) वैद्यकीय सेवा
बाहयरुग्ण सेवा :- ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी.
२४ तास तातडीची सेवा :- जखमा व अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश व इतर तातडीच्या रुग्णांना योग्य सेवा देणे.
संदर्भसेवा :- ज्या रुग्णाला विशेषज्ञांच्या सेवेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना योग्य व तत्पर संदर्भसेवा :- रुग्णांना पुर्वपदावर आणणे ( Stablization ) संदर्भसेवेच्या प्रवासा दरम्यान रुग्णांना योग्य त्या अनुषंगिक सेवा देणे. प्रा.आ.केंद्गाच्या वाहनातून अथवा वैद्यकीय अधिकार्यांजवळ असलेल्या उपलब्ध अनुदानातून, भाडयाच्या वाहनातून संदर्भसेवा देणे.
आंतररुग्ण सेवा ( ६ बेड )
कुटूंब कल्याण सेवा
योग्य कुटूंबनियोजनाच्या पध्दती अवलंबिण्यासाठी शिक्षण, मतपरिवर्तन व समुपदेशन करणे. गर्भनिरोधक साधने उपलब्ध करुन देणे. उदा.निरोध, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या, तातडीच्या वेळी घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या, तांबी इ. कायमस्वरुपी पध्दती जसे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया , पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया/बिनटाकाच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसारख्या कुटूंबनियोजनाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबिलेल्या योग्य जोडप्यांसाठी पाठपूरावा सेवा प्रशिक्षित व्यक्त्ी व साधने उपलब्ध आहेत अशा ठिकाण डाटा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय गर्भपाताच्या सेवा व त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणेत येईल.
वरील सेवांखेरील प्राथमिक आरोग्य केंद्ग जननी सुरक्षा योजनेच्या सुविधाही पुरवतील.
प्रजनन संस्थेचे आजार / लैगिक आजारांचे व्यवस्थापन
प्रजनन संस्थेचे आजार/लैंगिक आजार यांच्या प्रतिबंधनासाठी आरोग्य शिक्षण प्रजनन संस्थेचे आजार/लैगिक आजार यांचा उपचार. आहारविषयक सेवा (एकात्मिक बालविकास सेवा योजनेबरोबर समन्वयाने) शालेय आरोग्य :- नियमित तपासणी, योग्य उपचार, संदर्भसेवा व पाठपूरावा. पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :- जीवनकौशल्या प्रशिक्षण, समुपदेशन, योग्य उपचार. सुरक्षित पाठपुरावा व स्वच्छता यांसाठी प्रवृत्त करणे. त्या भागात कायमस्वरुपी आढळणारे आजार. उदा.हिवताप, काला आजार, जपानी, मेंदूदाह इत्यांदीचे प्रतिबंधन व नियंत्रण. रोगसर्वेक्षण आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण अस्वाभाविक आरोग्य घटनांबाबत जागरुकता व योग्य उपाययोजना पाणी साठ्यांचे निर्जंतुकीकरण पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी राष्ट्रीय साथरोग नियंत्रण संस्थेने तयार केलेल्या भ्रेस्त्रीप टेस्टच्या सहाय्याने करावी. सेप्टीक संडासचा वापर, कचर्याची योग्य विल्हेवाट यांसह स्वच्छतेसाठी प्रवृत्त करणे. जीवनविषयक आकडेवारीचे संकलन व अहवाल सादरीकरण. आरोग्य/शिक्षण वर्तणुकीतील बदलासाठी संदेशवहन. राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमासह इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे. नेहमीच्या व तात्काळ उपचार सुविधा देणाऱ्या सेवा
- जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्गात येतात त्यांना व जे रुग्ण उपकेंद्गावरुन अथवा अन्य ठिकाणांहून संदर्भसेवा दिल्याने येतात त्यांना या सेवा उपलब्ध व्हाव्यात. या सेवात खालील गोष्टींचा समावेश होतो.
उपचार देणे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्गात उपचार करणे शक्य नसलेल्या रुग्णांना संदर्भसेवा. रुग्णालयात दाखल करावयाची गरज आहे अशांना आंतररुग्ण उपचार देणे.
सद्यस्थितीत विविध दर्शकांचे जिल्हयातील दर खालीलप्रमाणे आहेत.
Not Compete
- गरोदर मातेला मिळणार्या प्रसुतीपूर्व सेवा :- ९८ टक्के
- प्रशिक्षित व्यक्तीने केलेली बाळंतपणे :- ९५ टक्के
- स्त्री- पूरुष प्रमाण (० ते ६ वर्षे) :- ८९५
- संरक्षित जोडपी प्रमाण :- ७४ टक्के
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी :-
- राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम
- राष्ट्रीय आर.सी.एच कार्यक्रम
- राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम
- सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रम या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे जिल्हयात खालील संस्था कार्यरत आहेत.
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
सेवाजेष्ठता सूची
Content Will Update Soon
योजना
अ.क्र. |
जिल्हा परिषदेचे नाव |
उपक्रमाचे नाव |
जिल्हा परिषद अंतर्गत अंमलबजावणी करणा-या विभागाचे नाव |
उपक्रमांतर्गत समाविष्ट प्रमुख बाबी/ घटक |
लाभ मिळणारे घटक / लाभार्थी |
नमुना आवेदन पत्र |
||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 |
सिंधुदुर्ग |
कॅन्सर,हदयरोग व किडनी अशा दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना जि.प.ची आर्थिक मदत देणे |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
1)लाभार्थी मागणी अर्ज 2)आधार कार्ड 3)रेशनकार्ड 4)ग्रा.पं.रहिवाशी दाखला 5)दा.रे.दाखला 6)हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड 7)15000/- रु.खर्चाची मुळ देयके |
अटी व शर्थीस अधिन राहून
प्रती लाभार्थी -15,000/- |
|
||||||||||
2 |
सिंधुदुर्ग |
सिंधुकीर्ती रुपे उरावे ही योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
मृत्यूपश्चात नेत्रदान/देहदान करणा-या व्यक्तीच्या वारसास/कुटुंबास रुपये 5000/- मानधन देणे (दु:खात सहभागी असलेबाबत/अंत्यसंस्कारासाठी) अंध व्यक्तीच्या जीवन नेत्ररुपाने प्रकाशमय होईल |
नेत्रदान/देहदान करणा-या व्यक्तीचा विहीत नमुन्यातील अर्ज संकलित करणे,मृत्यू प्रमाणपत्र,व्यक्ती वारसदार यांचे हमीपत्र, , संस्थेत मृत्यू झाल्याबाबत संस्थेचे मृत्यू प्रमाणपत्र,/
प्रती लाभार्थी 5000/- |
|
||||||||||
3 |
सिंधुदुर्ग |
सिंधु अनाथाचा नाथ ही योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
बाळंतपणाच्या प्रक्रियेत दुर्दैवी प्रसंगी बाळंतपणाच्या वेळी माता मृत्यू झाल्यास नवजात अर्भंक व तिची बालके अनाथ् होणार आहेत.अशा अनाथ बालकाकरिता भविष्यात तरतूद केल्यास (बचत प्रमाणपत्रे) दिल्यास बाळ जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याचे शैक्षणिक, व्यावसायिक कामी सदर योजनेचा आधार होणार आहे. माता मृत्यू झालेल्या मातचे नवजात अर्भक व या अगोदरची मुले (18 वर्षाआतील) जास्तीत जास्त 2 अपत्यापर्यंत या योजनांचा लाभ घेता येईल. |
जिल्हास्तरीय मातामृत्यू अन्वेषण समिती शिफारस पत्र, सरपंच दाखला, संस्थेत मृत्यू झाल्याबाबत संस्थेचे मृत्यू प्रमाणपत्र, उपचार घेतलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती, शिफारशीवर वैदयकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे बाळाच्या नावासह अभिप्राय प्रस्ताव, लाभ मिळणेकामी पालकांचे विनंतीपत्र आवश्यक/
प्रती लाभार्थी रुपये 10000/- |
|
||||||||||
4 |
सिंधुदुर्ग |
प्रा.आ.केंद्रस्तरावर शवविच्छेदक (कटर) यांना प्रोत्साहनपर मानधन ही योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
प्रा.आ.केंद्र ठिकाणी शवविच्छेदन करणा-या शवविच्छेदकाला प्रती शवविच्छेदनामागे रु.1000/- मानधन देणे.
शवविच्छेदक(पुरुष सफाईदार) |
प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रात होणारे अनैसर्गिक मृत्यू ज्याचे शवविच्छेदन करणे आवश्यक आहे अशा शवाबाबत शवविच्छेदनेकाला पुरुष सफाईदार यांना प्रती शवविच्छेदना मागे रु.1000/- / प्रती शवविच्छेदनामागे रु.1000/- |
|
||||||||||
5 |
सिंधुदुर्ग |
सिंधु आरोग्य मेळा ही योजना
|
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
जिल्ह्यातील कॅन्सर,हदयरोग व मधुमेह रुग्णांवर वेळीच निदान व उपचार होणेकरीता तज्ज्ञ डॉक्टरांच्या शिबिरांचे आयोजन करणे. जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय रुग्णालये,प्रा.आ.केंद्र येथे उपचारासाठी येणारे रुग्ण |
प्रत्येकी आरोग्य तपासणी शिबिरासाठी 50,000/- मर्यादीत
प्रत्येक 3 प्रा.आ.केंद्रासाठी 50,000/- प्रमाणे एकूण अनुदान र.रु.1,50,000/-
|
|
||||||||||
6 |
सिंधुदुर्ग |
सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
माघी पायी वारी करणा-या वारकऱ्यांंसाठी आरोग्य विभाग,जि.प.सिंधुदुर्ग मार्फत यावर्षी आंबोली मार्गे जाणा-या वारकऱ्यांसोबत एक रुग्णाहिका व वैभववाडी मार्गे जाणा-या वारकऱ्यांसोबत एक रुग्णाहिका अशा एकूण दोन रुग्णाहिकांचे सोबत वैद्यकीय पथक (यामध्ये वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहा.(पु./म.) आरोग्य सेवक(पु./म.)मदतनीस सेवा पुरविली जाणार आहे.) माघी पायी वारी करणारे वारकरी |
सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट पायी वारी करणारे वैद्यकीय पथकाला आंबोली व वैभववाडी मार्ग प्रत्येकी 50,000/- प्रमाणे
2 पथकासाठी 50,000/- प्रमाणे पायी वारी करणारे वारकऱ्यांसाठी या योजनेंतर्गत एकूण अनुदान-1,00,000/- |
|
||||||||||
7 |
सिंधुदुर्ग |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
पहिले अपत्य (मुलगा / मुलगी) व दुसरे अपत्य मुलगी असलेली महिला योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे. 1.ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु.8 लाख पेक्षा कमी आहे. 2.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला 3.ज्या महिला अंशत: (40%) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन) 4.बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला 5.आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी 6.ई-श्रम कार्ड धारण करणा-या महिला 7.किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी 8.मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला 9.गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/ अंगणवाडी मदतनीस (AWHs)/ आशा कार्यकर्ती (ASHAs). |
1.पहिल्या अपत्यासाठी- पहिला हप्ता- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासुन 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणांची नोंदणी आणि किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी करून घेणे आवश्यक आहे. रु.3000/- दुसरा हप्ता- अ)जन्म नोंदणी प्रमाणपत्र ब)बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, आयपीव्ही आणि हिपॅटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण) करणे आवश्यक आहे. रु.2000/- 2.दुस-या अपत्यासाठी (मुलगी असल्यास)- बाळाच्या जन्मानंतर (जर एखादया लाभार्थीस तिच्या दुस-या गरोदरपणात एकापेक्षा जास्त (जुळे/तिळे/चार) अपत्ये झाली असतील व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर तिला PMMVY 2.0 नियमांनुसार दुस-या मुलीसाठीचा लाभ मिळेल.) एकरकमी रु.6000/-. |
|
||||||||||
8 |
सिंधुदुर्ग |
आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
लाभार्थी - 1.सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011(SECC)मध्ये नोंदविलेली कुटुंबे 2.राष्ट्रिय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) मधील समाविष्ट अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गटातील (PHH)कुटुंबे
|
रु.पाच लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष आरोग्य संरक्षण 34 विशेष सेवांतर्गत 1356 आरोग्य उपचार मोफत |
|
||||||||||
9. |
सिंधुदुर्ग |
माहात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना |
|
|
गट अ ते इ गटसाठी (ड वगळून )रु.पाच लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष आरोग्य संरक्षण 34 विशेष सेवांतर्गत 1356 आरोग्य उपचार मोफत गट ड करिता रु.1 लाख प्रति व्यक्ती प्रति वर्ष रस्ता अपघात रुग्णांसाठी 184 आरोग्य उपचार पॅकेज |
|
||||||||||
10 |
सिंधुदुर्ग |
जननी सुरक्षा योजना |
|
अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती व दारिद्रय रेषेखालील सर्व गर्भवती महिला आवश्यक कागदपत्रे – 1.MCP कार्ड 2. RCH नंबर 3.महिलेचे बँक खातेबुक |
बाळंतपण घरी झाल्यास 500/- रुपये बाळंतपण शासकीय किंवा शासन मान्य मानांकित आरोग्य केंद्रात झाल्यास
|
|
||||||||||
11 |
सिंधुदुर्ग |
आरोग्य दृष्टया ना-हरकत दाखला |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
निवासी / वाणिज्य प्रयोजनार्थ जागा अकृषक/रेखांकन(बिनशेती)करणे.
|
1)मागणी अर्ज 2)7/12 उतारा (1 प्रत) 3)8 अ उतारा (1 प्रत) 4)ग्रामपंचायत ना-हरकत दाखला. (1 प्रत) 5)गट बूक नकाशा (1 प्रत) 6)इमारत बांधकाम नकाशा (ब्लु प्रिंट) (1 प्रत) 7)जमिनीतील हितसंबधाचे संमत्तीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र(100 रु.स्टँप पेपर)(1 प्रत) 8)प्रकल्प अहवाल 9)व्यवसायबाबत सांडपाणी,घनकचरा,योग्य विल्हेवाटबाबत हमीपत्र(100 रु.स्टँप पेपर)(1 प्रत) (7/12 मध्ये सहहिस्सेदार असल्यास )
|
|