लघु पाटबंधारे विभाग
विभागा विषयी
जिल्हा परिषदेकडे एप्रिल 1986 मध्ये लघुपाटबंधारे विभाग निर्माण झाला. या विभागामार्फत प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये 0 ते 100 हे.पर्यंतच्या पाटबंधारे योजनांची बांधकामकेली जातात. जिल्ह्यामध्ये या विभागाचे कामकाज 1 विभागीय कार्यालय व याविभागाच्या 4 उपविभागामार्फत केली जातात.
अ.क्र. | उपविभागाचे नाव | उपविभागाचे मुख्यालय | उपविभागांतर्गत तालुके |
---|---|---|---|
1 | उपविभाग सावंतवाडी | सावंतवाडी | सावंतवाडी, दोडामार्ग |
2 | उपविभाग कुडाळ | कुडाळ | कुडाळ, वेंगुर्ले |
3 | उपविभाग मालवण | मालवण | मालवण, कणकवली |
4 | उपविभाग वैभववाडी | वैभववाडी | वैभववाडी, देवगड |
या विभागामार्फत 0 ते 100 हेक्टर पर्यंत सिंचन क्षमता असणाऱ्या सर्व प्रकारच्या पाटबंधारे योजना राबविल्या जातात. यामध्ये सर्वसाधारणपणे खालील योजनांचा अंतर्भाव आहे.
या योजनेंतर्गत नदी / नाल्यावर सदरच्या तलावाचे बांधकाम करून पाणी साठा केला जातो व या जलसाठ्याच्या नजीकच्या शेतामध्ये पाटाद्वारे पाण्याचे वितरण करून सिंचनाखाली क्षेत्र आणले जाते.
निकष:-
- मापदंड-खर्चाचे निकष – र.रू.237347/ स.घ.मी.
- लाभधारक शेतकऱ्यांची सहकारी पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक
या योजनेंतर्गत नदी किंवा नाल्यावर बंधारा बांधून या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी उपसा करून वापरणेत येते.
निकष:-
- मापदंड-खर्चाचे निकष – र.रू.147257/ स.घ.मी.
- लाभधारक शेतकऱ्यांची सहकारी पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक
या योजनेंतर्गत नदी किंवा नाल्यावर बंधारा बांधून या बंधाऱ्यामधील पाणी बंधाऱ्याच्या नजीक असलेल्या ग्रामस्थांच्या शेतपाटाद्वारे सिंचनासाठी वळवणेत येते व त्याद्वारे सिंचन केले जाते.
निकष:-
- मापदंड-खर्चाचे निकष – र.रू.120855/ स.घ.मी.
- लाभधारक शेतकऱ्यांची सहकारी पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक
सदर योजनेचा उद्देश भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे व संरक्षित सिंचनाची सोय करणे.
- सिमेंट नाला बांधाची प्रस्तावित जागा तांत्रिकदृष्या योग्य असलेबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा दाखला
- 12 नोव्हेंबर 2013 च्या शासननिर्णयातील सुचनांनुसार सिमेंट नाला बांध साखळी पद्धतीने घेणे अनिवार्य
- मा.अधीक्षक अभियंता, दगडी धरण मंडळ, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिक यांचे दिनांक 19-08-2013 च्या पत्रानुसार प्राप्त संकल्प चित्रानुसार सिमेंट नाला बांधाचे काम आवश्यक
- लाभ – व्यय गुणोत्तर प्रमाण एक पेक्षाअधिक असणे आवश्यक
- को.प.बंधारेच्या साठवण क्षमतेच्या आर्थिक मापदंडानुसार असणे आवयक मापदंड-खर्चाचे निकष- र.रू.147257/स.घ.मी.
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
सेवाजेष्ठता सूची
Content Will Update Soon