आवेदन पत्र नमुने
सामान्य प्रशासन विभाग
वित्त विभाग
ग्रामपंचायत विभाग
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा
समाजकल्याण विभाग
क्र |
योजना नाव |
योजना तपशिल / स्वरुप |
लाभार्थी निकष व जोडावयाची आवश्यक कागदपत्रे |
आवेदन पत्र
|
||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 |
जि.प. २०% सेस अनुदानातून समाजमंदिर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य देणे.
|
जिल्हा परिषद 20% सेस अनुदानातून मागासवर्गियांसाठी समाजमंदिर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य देणे ही योजना आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रात असणा-या मागासवर्गिय वस्तीत लाभ व अर्थसहाय्य मिळणेसाठीचा प्रस्ताव आहे. |
०१. मागासवर्गीय लोकांचा मागणी अर्ज. ०२. लोकसंख्या दाखला. ०३ समाजमंदिराचा उपयोग मागसवर्गीयांना होणार असलेबाबचा सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीचा दाखला. ०४. समाजमंदिर असेसमेंट उतारा. ०५. उपअभियंता बांधकाम यांचे समाजमंदिर दुरुस्तीचे तांत्रिक मंजूरीचे अंदाजपत्रक. ०६ मंजूर अनुदानापेक्षा जादा होणारा खर्च ग्रा.प. स्वतःच्या उत्पन्नातून करीत असलेबाबत ग्रा.प. ठरावाची प्रत. ०७ समाज मंदिर दुरुस्ती शासनाकडून कोणत्याही योजनेतून मंजूर झालेले किंवा प्रस्तावित नसलेबाबत किंवा यापूर्वी लाभ घेतला नसले बाबत ग्रामसेवक, सरपंच याचा दाखला. ०८ कामाचा मंजूरी आदेश प्राप्त झालेपासून एक महिन्याचे आत काम पूर्ण करीत असले बाबत ग्रामसेवक, सरपंच याचा दाखला. ०९ समाज मंदिर दुरुस्ती मंजूर करणेबाबत ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत. १० समाज मंदिर दुरुस्तीस ग्रामपंचायत परवानगी.
|
Download |
||||||||||
2 |
. जि.प. २०% सेस अनुदानातून मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते तयार करणेसाठी अर्थसहाय्य देणे
|
जिल्हा परिषद 20% सेस अनुदानातून मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते तयार करणे ही योजना आमच्या ग्रामपंचायती क्षेत्रात असणा-या मागासवर्गिय वस्तीत लाभ व त्यासाठी अर्थसहाय्य देते |
०१ मागासवर्गीय लोकांचा मागणी अर्ज ०२ लोकसंख्या दाखला ०३ जोडरस्त्याचा उपयोग मागसवर्गीयांना होणार असलेबाबचा सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीचा दाखला ०४ जोडरस्ता ग्रा.पं. न.नं. २३ चा उतारा जोडणे आवश्यक. ०५ उपअभियंता बांधकाम यांचे कडील रु.४.०० लाख मर्यादित जोडरस्त्याचे अंदाजपत्रक ०६ मंजुर अनुदानापेक्षा जादा होणारा खर्च ग्रा.प. स्वतःच्या उत्पन्नातून करीत असले बाबत ग्रा.प. ठराव. ०७ प्रस्तावित जोडरस्ता शासनाकडून कोणत्याही योजतून मंजूर किंवा प्रस्तावित नसले बाबत ग्रामसेवक, सरपंच याचा दाखला ०८ प्रस्तावित रस्ता या पूर्वी अन्य योजनेतून झाला असुन दोष दायीत्व कालावधी पूर्ण झालेला आहे. आज रोजी सदरचा रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत नसले बाबत ग्रामसेवक सरपंच याचा दाखला ०९ कामाचामंजूरी आदेश प्राप्त झालेपासून एक महिन्याचे आत काम पूर्ण करीत असले बाबत ग्रामसेवक, सरपंच याचा दाखला १० जोडरस्ता मंजुर करणेबाबत ग्रामपंचायतीचा ठराव.
|
Download |
||||||||||
3 |
जि.प. २०% सेस अनुदानातून स्मशान भुमित शेड बांधणेसाठी अर्थसहाय्य देणे |
जिल्हा परिषद 20% सेस अनुदानातून मागासवर्गीयांसाठी स्मशानभूमीत शेड बांधणेसाठी अर्थसहाय्य देणे ही योजना आमच्या ग्रामपंचायती क्षेत्रात असणा-या मागासवर्गिय वस्तीत लाभ व त्यासाठी अर्थसहाय्य देते |
०१ मागासवर्गीय लोकांचा मागणी अर्ज ०२ मागासवर्गीय वस्तीची लोकसंख्या ग्रामसेवक यांचा दाखला ०३ स्मशानभूमिचा उपयोग मागसवर्गीयांना होणार असलेबाबचा सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीचा दाखला ०४ स्मशानशेडसाठी जमिनीचा ७/१२ किंवा बक्षिसपत्र/ग्रा.पं. कडे स्मशानभूमीची नोंद असलेचा मालमत्ता रजिस्टर उतारा जोडणे आवश्यक. ०५ उपअभियंता बांधकाम यांचे कडील रु.४.०० लाख मर्यादेत स्मशान शेडचे अंदाजपत्रक ०६ मंजूर अनुदानापेक्षा जादा होणारा खर्च ग्रा.पं. स्वतःच्या उत्पन्नातून करील असले बाबत ग्रा.पं. ठराव. ०७ स्मशान शेड योजनेसाठी शासनाकडून कोणत्याही योजतून मंजूर झालेला किंवा प्रस्तावित नसलेबाबत किंवा यापूर्वी लाभ घेतला नसले बाबत ग्रामसेवक, सरपंच याचा दाखला. ०८ कामाचा मंजूरी आदेश प्राप्त झालेपासून एक महिन्याचे आत काम पूर्ण करीत असले बाबत ग्रामसेवक, सरपंच यांचा दाखला ०९ स्मशान शेड मंजूर करणेबाबत ग्रामपंचायतीचा ठराव. १० स्मशान शेड बांधणेसाठी ग्रामपंचायत परवानगी .
|
Download |
||||||||||
4 |
जि.प. २०% सेस अनुदानातून मागासवर्गीयांना ग्रासकटर खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे
|
सदरची योजना ही जिल्हा परिषद 20% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी स्थनिक स्तरावरून दर निश्चित करून पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दराच्या 90% अनुदान जमा केले जाते. |
०१ लाभार्थी हा ग्रामिण भागातील अनुसुचित जाती/जमाती, नवबौध्द, विजाभज वापैकी असलेबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला. ०२ लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असलेबाबतचा दाखला किंवा त्याचे वार्षिक उत्पन्न रु. ७०,०००/- च्या मर्यादेत असलेबाबत तहसिलदार यांचेकडील दाखला. ०३ लाभार्थी हा संबधित गांवचा रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र. ०४ लाभार्थी सदर योजनेस पात्र असलेबाबत ग्रामसभेचा ठराव, जोडणे आवश्यक आहे. ०५ या योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र, ०६ रेशनिंगकार्डची छायांकीत प्रत. ०७ लाभार्थ्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रत. ०८ लाभार्थ्यांच्या बँक पासबुकची (IFSC कोडसह) छायांकित प्रत. ०९ छोटे कुंटुंब बाबत स्वंयघोषणापत्र १० लाभार्थीचे रक्कम रुपये १००/-च्या बॉन्डपेपरवर खालील बाबी नमूद असलेले मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे समक्ष केलेले हमीपत्र आवश्यक. (सदरचे हमीपत्र हे ग्रासकटरचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर करावयाचे आहे) |
Download |
||||||||||
5 |
जि.प. २०% सेस अनुदानातून मागासवर्गीयांना पिठाची गिरण (घरघंटी) खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे
|
सदरची योजना ही जिल्हा परिषद 20% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी स्थनिक स्तरावरून दर निश्चित करून पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दराच्या 90% अनुदान जमा केले जाते. |
१ लाभार्थी हा ग्रामिण भागातील अनुसूचति जाती / जमाती नवबौध्द, विजाभज, यापैकी असलेबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला २ लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असलेबाबतचा दाखला किंवा त्याचे वार्षिक उत्पन्न रु.७०,०००/- च्या मर्यादित असलेबाबत तहसिलदार यांचा दाखला. ३ लाभार्थी हा संबधित गांवचा रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र. ४ लाभार्थी सदर योजनेस पात्र असलेबाबत ग्रामसभेचा ठराव. ५ लाभार्थ्यांने या योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नसलेबाबत स्वंयघोषणापत्र. ६ व्यवसायासाठी आवश्यक जागा असलेबाबत ग्रामपंचायतीचा असेसमेंट उत्तारा (भाडेकरू असलेस घरमालकाचे र.रु. १००/- च्या स्टॅम्पवर संमतीपत्र) आवश्यक ७ व्यवसायासाठी लाईट आवश्यक असल्याने लाईट बिल. (लाईट बिल दुसऱ्या व्यक्तीच्या नांवे असल्यास साध्या कागदावर संमतीपत्र आवश्यक) ८ लाभार्थ्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रत. ९ लाभार्थ्यांच्या बँक पासबुकची (IFSC कोडसह) छायांकित प्रत. १० दिनांक ०९ में २००० च्या शासन निर्णयानुसार छोटे कुंटुब असलेबाबत स्वयंघोषणापत्र ११ लाभार्थ्यांच्या शिधापत्रक (रेशनकार्डची) छायांकित प्रत. १२ लाभार्थी यांनी खालील बाबी नमूद असलेले गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे समक्ष केलेले साध्या कागदावर हमीपत्र आवश्यक. (सदरचे हमीपत्र हे पिठाची गिरण (घरघंटी) चा प्रस्ताव मंजूर झाल्यावर करावयाचे आहे.) |
Download |
||||||||||
6 |
जि.प. २०% सेस अनुदानातून मागासवर्गीयांना शिलाई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे
|
सदरची योजना ही जिल्हा परिषद 20% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी स्थनिक स्तरावरून दर निश्चित करून पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दराच्या 90% अनुदान जमा केले जाते. |
०१ लाभार्थी हा ग्रामिण भागातील अनुसूचित जाती/जमाती, नवबौध्द, विजाभज यापैकी असलेबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला ०२ लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असलेबाबत दाखला किंवा त्याचे वार्षिक उत्पन्न रु. ७०,०००/- च्या मर्यादेत असलेबाबत तहसिलदार यांचा दाखला. ०३ लाभार्थीचे वय १८ ते ५० वर्षापर्यंत असलेबाबत जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा वैदयकिय अधिकारी (शासकिय वैदयकिय अधिकारी) यांनी दिलेला दाखला. ०४ लाभार्थीने शासन किंवा शासनमान्य संस्थेमार्फत शिलाई मशिनचा कोर्स पूर्ण केलेला असलेबाबतचे प्रमाणपत्र. ०५ लाभार्थी हा संबंधित गांवचा रहिवाशी असलेबाबत स्वंयघोषणापत्र. ०६ लाभार्थ्याने सदर योजनेस पात्र असलेबाचत ग्रामसभेचा ठराव.
|
Download |
||||||||||
|
|
|
०७ लाभार्थ्याने या योजनेचा समाज कल्याण विभाग किंवा शासनाच्या अन्य विभागाकडून यापूर्वी लाभ घेतला नसलेबाबत स्वंयघोषणापत्र ०८ लाभार्थ्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रत, ०९ दिनांक ०९ मे २००० च्या शासन निर्णयानुसार छोटे कुटुंब असलेबाबत स्वंयघोषणापत्र १० लाभार्थ्यांच्या शिधापत्रक (रेशनकार्डची) छायांकित प्रत. ११ लाभार्थ्यांच्या बँक पासबुकची छायांकित प्रत (IFSC कोडसह) १२ लाभार्थी यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे समक्ष केलेले साध्या कागदावर हमीपत्र आवश्यक. (संदरचे हमीपत्र हे शिलाई मशिनचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर करावयाचे आहे.)
|
Download |
||||||||||
7 |
जि.प.२०% सेस अनुदानातून मागासवर्गीय लाभार्थ्यांना जुने घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य देणे |
सदरची योजना ही जिल्हा परिषद 20% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दर र. रु.35,000/- एवढे अनुदान जमा केले जाते. |
०१ लाभार्थी अनु. जाती/अनु. जमाती/विमुक्त जाती, भटक्या जमाती व नवबौध्द या जातीचा असलेबाबत तहसिलदार यांनी दिलेला जातीचा दाखला. ०२ लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असलेबाबतचा दाखला किंवा तहसिलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्न रु.७०,०००/- चे मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला. ०३ अर्जदाराचा नमुना नं. ८ असेसमेंट उतारा (घर आ.ब.क. असल्यास सह-हिस्सेदाराचे साध्यापेपरवर संमत्ती पत्र सरपंच समक्ष) ०४ लाभार्थी निवडीचा ग्रामसभेचा ठराव ०५ अर्जदारास इतर योजनेतून घरदुरूस्तीसाठी अनुदान मिळाले नसल्याबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला ०६ यापूर्वी लाभ घेतला नसल्याबाबतचा ग्रामसेवक / सरपंच यांचे संयुक्त सहीचा दाखला. ०७लाभार्थ्यांचे कुटुंबांतील कोणतीही व्यक्ती शासकीय / निमशासकीय सेवेत नाही तसेच शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्तीधारक नाही. असे लाभार्थी यांचे साध्या कागदावर हमीपत्र ०८ रहिवासी राखला स्वयंघोषणापत्र.. ०९ गटविकास अधिकारी यांचे अधिनस्त असलेले कनिष्ठ अभियंता यांचेकडून पहाणी अंदाजपत्रक तसेच काम पूर्ण झालेनंतर मूल्यांकन दाखला प्रस्तावासोबत जोडण्यांत यावा. १० रेशनिंग कार्ड छायांकीत प्रत ११ आधारकार्ड छायाकिंत प्रत १२ जुने घर दुरुस्तीची आवश्यक असलेबाबतचा ग्रामसेवक / सरपंच यांचे संयुक्त सहीचा दाखला. १३ दुरुस्ती करावयाच्या घराचा फोटो १४ छोटे कुंटुंब बाबत स्वंयघोषणापत्र |
Download |
||||||||||
8 |
अस्थीव्यंग व्यक्तींना निर्धारीत साहित्य पुरविणे स्वयंचलीत ३ चाकी पुरविणे
|
सदरची योजना ही जिल्हा परिषद 5% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी स्थनिक स्तरावरून दर निश्चित करून पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दराच्या 100% अनुदान जमा केले जाते. |
०१ लाभार्थीचे अपंग असल्याचे ४०% व त्यापेक्षा पेक्षा जास्त अस्थिव्यंग असले बाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील ऑन लाइन त्रिस्तरिय मंडळाचे प्रमाणपत्र स्वालंबन कार्ड (यु.आय.डी) (छायांकित प्रत.) ०२ लाभार्थी हा गावातील रहिवासी असले बाबत सरपंच व ग्राम सेवक यांच्या संयुक्त सहिचा दाखला. ०३ लाभार्थी याने यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसलेबाबत दाखला सरपंच ग्रामसेवक दाखला. ०४ ग्रामसभा मंजूर ठराव ०५ लाईटबिल आधारकार्ड रेशनकार्ड यांच्या स्वतंत्र प्रति जोडण्यात यावेत. ०६ अर्जदाराचा संपूर्ण फोटो ०७ लाभार्थीचे (सि.जि.म.स. बँक लि.) बँकेच्या खात्याच्या पासबुकच्या पहील्या पानाची छायांकित प्रत ०८ लाभार्थी यांचे नावे थेट जमा करणेसाठी डी.बी.टी. फॉर्म ०९ व्हील चेअर/३ चाकी सायकल/स्वयंचलीत ३ चाकी ची मागणी असल्यास सिव्हील सर्जन यांजकडील श्री व्हीलर चालवण्यास सक्षम आहे तसेच आर.टी.ओ. (RTO) दाखला प्रस्तावासोबत जोडावा / कमोड वेअर कमोड स्टुल / या साहित्याची मागणी |
Download |
||||||||||
9
10 |
जि.प.५% सेस अनुदानातून दिव्यांग व्यक्तीना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरण (घरघंटी) खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे
जि.प.५% सेस अनुदानातून दिव्यांग व्यक्तींना घरकुलासाठी अर्थसहाय्य देणे
|
सदरची योजना ही जिल्हा परिषद 5% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी स्थनिक स्तरावरून दर निश्चित करून पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दराच्या 100% अनुदान जमा केले जाते.
सदरची योजना ही जिल्हा परिषद 5% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी स्थनिक स्तरावरून दर निश्चित करून पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दराच्या 100% अनुदान जमा केले जाते.
|
असल्यास आरोग्य विभागाचे लाभार्थीस आवश्यकता आहे, असे प्रमाणपत्र १० अपंग लाभार्थीचे वय १८ ते ५० वर्षापर्यंत असणे आवश्यक यासाठी वया बाबतचा पुरावा म्हणून लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक. ११ सदर लाभार्थी अगर कुंटुबातील शासकिय किंवा निमशासकिय सेवेत नसले बाबत हमीपत्र तसेच आर.टी.ओ. (RTO) कडून वाहन विक्री किंवा हस्तातरण करणार नाही अशी आरसी बुकवर नोद करून घेण्याची हमी १०० च्या बॉण्डपेपरवर आवश्यक
०१ अर्जदाराचे अपंगत्व ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेबाबतचे सक्षम प्राधिकरण यांचेकडील त्रिस्तरिय अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ०२ लाभार्थी हा संबंधित गावचा रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र ०३ लाभार्थी सदर योजनेस पात्र असलेबाबत ग्रामसभेचा ठराव. ०४ लाभार्थ्याने या योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र.. ०५ व्यवसायासाठी आवश्यक जागा असलेबाबत ग्रामपंचायतीचा असेसमेंट उतारा (भाडेकरू असलेस घरमालकाचे साध्या पेपखर संमतीपत्र). ०६ व्यवसायासाठी लाईट आवश्यक असल्याने लाईट बिल, ०७ लाभार्थ्याने वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठीचा निधी खाते क्रमांक मध्ये थेट जमा करणेबाबतचा पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक. ०८ लाभार्थ्यांच्या बँक पासबुकाची (IFSC कोडसह) छायांकित प्रत. ०९ लाभार्थ्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रत. १० लाभार्थीचे साध्या पेपरवर खालील बाबी नमूद असलेले गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे समक्ष केलेले हमीपत्र आवश्यक.
०१ अर्जदाराचे अपंगत्व ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असले बाबतचे सक्षम प्राधिकरण यांचेकडील त्रिस्तरीय समितीचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ०२ घर बांधणेसाठी लाभार्थीकडे जागा उपलब्ध असलेबाबत ७/१२ उत्तारा किवा जागा उपलब्ध नसल्यास जमिन देणा-या जमिन मालकाचे साध्या कागदावर सरपंच/ग्रामसेवक यांचे समक्ष संमतीपत्र, ०३ अर्जदाराकडे कच्चे घर असल्यास अर्जदाराचा नमुना नं. ८ असेसमेंटचा उतारा कच्चे घर सामाईक असल्यास सहहिस्सेदार यांचे साध्या कागदावर सरपंच/ग्रामसेवक यांचे समक्ष संमतीपत्र ०४ अर्जदाराकडे कच्चे घर असलेबाबत किंवा अर्जदार यांचे कुटुंब बेघर असलेबाबत ग्रामसेवकांचा दाखला. ०५ लाभार्थीचे छोटे कुटुंब (२ जिवंत अपत्य) बाबतचे अर्जदार यांचे स्वयंघोषणापत्र ०६ लाभार्थ्यांच्या रेशनकार्डची छायांकित प्रत. ०७ यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसल्याबाबत अर्जदार यांचे स्वयंघोषणापत्र ०८ लाभार्थी सदर योजनेस पात्र असलेबाबत ग्रामसभेच्या ठरावाची प्रत. ०९ लाभार्थ्याच्या बँक पास बुकाची (IFSC कोडसह) छायांकित प्रत. १० लाभार्थ्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रत. ११ लाभार्थ्याने वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी खाते क्रमांक मध्ये थेट जमा करणेबाबतचा पूर्ण भरलेला अर्ज सोबत जोडावा. १२ लाभार्थीचे साध्या कागदावर खालील बाबी नमूद केलेले हमीपत्र. (सदरचे हमीपत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे समक्ष करावयाचे आहे.)
|
|
||||||||||
11 |
जि.प. ५% अपंग कल्याण निधीतून अंध प्रवर्गातील दिव्यांगाना मोबाईल फोन खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे
|
सदरची योजना ही जिल्हा परिषद 5% स्वउत्पन्नातील असून सदर योजनेसाठी स्थनिक स्तरावरून दर निश्चित करून पात्र लाभार्थ्यांच्या खाती निश्चीत दराच्या 100% अनुदान जमा केले जाते.
|
०१ लाभार्थीचे अंध प्रवर्गातील ४०% व त्यापेक्षा जास्त अपंग असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील ऑनलाईन त्रिस्तरीय मंडळाचे प्रमाणपत्राची छायांकीत प्रत. ०२ लाभार्थी गावातील रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र. ०३ लाभार्थी निवड बाबत ग्रामसभा ठरावाची प्रत. ०४ यापूर्वी लाभ घेतले नसल्याबाबत लाभार्थीचे साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र ०५ लाभार्थीचे वय १८ ते ५० वर्ष असलेबाबतचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला ०६ आधारकार्ड छायांकीत सत्यात. ०७ रेशनिंग कार्ड छायांकीत सत्यप्रत. ०८ बँक पासबुकची छायांकीत प्रत. बँक खाते क्रमांक IFSC कोडसह. सुस्पष्ट दिसणारी छायांकीत सत्यप्रत. ०९ लाभार्थी कोणत्याही शासकीय / निम शासकीस सेवेत नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र १० लाभार्थ्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठीचा निधी खाते क्रमांकमध्ये थेट जमा करणेबाबतचा पूर्ण भरलेला अर्ज |
|
||||||||||
12 |
दिव्यांगांना स्वयं रोजगारासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत अर्थ सहाय्य पुरविणे.
|
सदरची योजना ही दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी बॅंकने दिलेल्या कर्जामध्ये 20% अनुदान देण्यासाठी आहे. (1,50,000/- कर्ज मर्यादीत).
|
०१ विहीत नमुन्यातील अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिकट वावा. ०२ किमान ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र. ०३ वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचेकडील दाखला उत्पन्न मर्यादा वार्षिक १ लाखापेक्षा कमी. ०४ व्यवसाया बाबतचा प्रकल्प अहवाल (Project Report) ०५ अपंग व्यक्ती करु इच्छीत असलेल्या व्यवसायाचे कोटेशन ०६ वयोमर्यादा १८ ने ५० वर्षे वयाबाबतचा पुरावा म्हणून जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला छायांकीत प्रत. ०७ रहिवाशी दाखला/ स्वयंघोषित प्रमाणपत्र ०८ दोन प्रतिष्ठित व्यक्तींची ओळखपत्रे ०९ दोन आय कार्ड साईज फोटो त्यातील एक फोटो विहीत नमुन्यातील अर्जावर चिकटवावा १० राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची IFSC कोड सह सुस्पष्ट छायांकित सत्यप्रत. ११ जागेची कागदपत्रे किंवा जागा गाळा व्यवसायासाठी भाड्याने घ्यावयाची असल्यास मालकाचे रु.१००/- च्या कोर्ट फी स्टॅम्प पेपरवर करारपत्र. १२ सुवाच्च व पूर्णपणे भरलेला प्रस्ताव दोन प्रतीत सर्व कागदपत्रे सत्यप्रतीसह नमुन्यातील अर्जासहीत सादर करणे आवश्यक १३ आधारकार्डची छायांकीत सत्यप्रत १४ रेशनिंग (शिधावाटप पत्रकाची) छायांकीत प्रत |
|
||||||||||
13 |
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे आर्थिक सहाय्य देणे
|
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे आर्थिक सहाय्य देणे या योजनेंतर्गत दलित वस्तीतील कामांना मंजूरी दिली जाते
|
०१ मागासवर्गीय ग्रामस्थांचा मागणी अर्ज. ०२ काम अंदाजपत्रकदाने विहीत मुदतीत पूर्ण करणेचा तसेच मंजुर अनुदानापेक्षा जादा खर्च ग्रामपंचायत स्वनिधीतुन करणेस तयार असलेबाबतचा मासिक सभेचा ठराव ०३ मागासवर्गीय लोकसंख्येचा ग्रामसेवक दाखला ०४ सदरच्या कामांचा उपयोग मागासवर्गीय जनतेस होणार असलेबाबतथा सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीचा दाखला ०५ कामासाठी आवश्यक जमीन ७/१२ उतारा किंथा ग्रा.पं.न.नं.२२ (पूर्वीचा २५ उतारा) किंवा ग्रा.पं.म.नं.२३ (पूर्वीचा २६ उतारा) ०६ तांत्रिक मंजूरीचे अंदाजपत्रक (सक्षम अधिकारी यांचे स्वाक्षरीसह) ०७ प्रस्तावीत काम शासनाचे अन्य योजनेतून मंजूर अगर प्रस्तावीत नसलेबाबतचा सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीचा दाखला ०८ यापूर्वी दलित वस्तीत शासन निधीतून झालेल्या कामांची यादी ०९ ग्रामपंचायतीचे कॅशबुक डगौरा १० ग्रामपंचायतीचे नमुना नं.३ व ४
|
|
||||||||||
14 |
आंतरजातीय विवाहितांस प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देणे
|
आंतरजातीय विवाहितांस प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देणे या योजनेंतर्गत जोडप्याच्या संयुक्त खाती र. रु. 50,000/- (अक्षरी- पन्नास हजार मात्र) एवढे अनुदान दिले जाते. |
०१ विवाह नोंदणी दाखला. ०२ वर वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले. ०३ वर अथवा वधु मागासवर्गीय असतील त्या बाबतचे संबंधित उप विभागीय दंडाधिकारी यांनी जातीचा दाखला इतर मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला देणे आवश्यक आहे. ०४ वधू वराचे एकत्रित फोटो. ०५ दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस पत्रे. ०६ वर वधू यांचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचा वय अधिवास मा. जिल्हाधिकारी यांचा दाखला. ०७ वर/वधू (जुने नावाने) संयुक्त बँक पास बुक झेरॉक्स. ०८ वर/वधू यांचे रेशन कार्ड व आधार कार्ड, शिफारस पत्र (नमुना)
|
|
||||||||||
15 |
अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देणे |
एखाद्या सुदृढ व्यक्तीने एखाद्या दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास सदरची योजना त्या जोडप्यासाठी लागु आहे. सदर योजनेंतर्गत जोडप्याला र. रु. 50,000/- (अक्षरी- पन्नास हजार मात्र) एवढे अनुदान |
वराचे संपूर्ण नाव अपंगत्वाचे प्रमाण शिक्षण व्यवसाय/उद्योग कार्यालयाचे नाव/हुद्दा मूळ राहण्याचे ठिकाण वधूचे संपूर्ण नाव- अपंगत्वाचे प्रमाण- शिक्षण व्यवसाय/उद्योग कार्यालयाचे नाव/हुद्दा मूळ राहण्याचे ठिकाण इतर माहिती- विवाह पध्दतीः- वैदिक/नोंदणी विवाहाचा दिनांक :- विवाह स्थळ:- |
|
आरोग्य विभाग
अ.क्र. |
जिल्हा परिषदेचे नाव |
उपक्रमाचे नाव |
जिल्हा परिषद अंतर्गत अंमलबजावणी करणा-या विभागाचे नाव |
उपक्रमांतर्गत समाविष्ट प्रमुख बाबी/ घटक |
लाभ मिळणारे घटक / लाभार्थी |
नमुना आवेदन पत्र |
||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 |
सिंधुदुर्ग |
कॅन्सर,हदयरोग व किडनी अशा दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना जि.प.ची आर्थिक मदत देणे |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
1)लाभार्थी मागणी अर्ज 2)आधार कार्ड 3)रेशनकार्ड 4)ग्रा.पं.रहिवाशी दाखला 5)दा.रे.दाखला 6)हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड 7)15000/- रु.खर्चाची मुळ देयके |
अटी व शर्थीस अधिन राहून
प्रती लाभार्थी -15,000/- |
|
||||||||||
2 |
सिंधुदुर्ग |
सिंधुकीर्ती रुपे उरावे ही योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
मृत्यूपश्चात नेत्रदान/देहदान करणा-या व्यक्तीच्या वारसास/कुटुंबास रुपये 5000/- मानधन देणे (दु:खात सहभागी असलेबाबत/अंत्यसंस्कारासाठी) अंध व्यक्तीच्या जीवन नेत्ररुपाने प्रकाशमय होईल |
नेत्रदान/देहदान करणा-या व्यक्तीचा विहीत नमुन्यातील अर्ज संकलित करणे,मृत्यू प्रमाणपत्र,व्यक्ती वारसदार यांचे हमीपत्र, , संस्थेत मृत्यू झाल्याबाबत संस्थेचे मृत्यू प्रमाणपत्र,/
प्रती लाभार्थी 5000/- |
|
||||||||||
3 |
सिंधुदुर्ग |
सिंधु अनाथाचा नाथ ही योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
बाळंतपणाच्या प्रक्रियेत दुर्दैवी प्रसंगी बाळंतपणाच्या वेळी माता मृत्यू झाल्यास नवजात अर्भंक व तिची बालके अनाथ् होणार आहेत.अशा अनाथ बालकाकरिता भविष्यात तरतूद केल्यास (बचत प्रमाणपत्रे) दिल्यास बाळ जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याचे शैक्षणिक, व्यावसायिक कामी सदर योजनेचा आधार होणार आहे. माता मृत्यू झालेल्या मातचे नवजात अर्भक व या अगोदरची मुले (18 वर्षाआतील) जास्तीत जास्त 2 अपत्यापर्यंत या योजनांचा लाभ घेता येईल. |
जिल्हास्तरीय मातामृत्यू अन्वेषण समिती शिफारस पत्र, सरपंच दाखला, संस्थेत मृत्यू झाल्याबाबत संस्थेचे मृत्यू प्रमाणपत्र, उपचार घेतलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती, शिफारशीवर वैदयकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे बाळाच्या नावासह अभिप्राय प्रस्ताव, लाभ मिळणेकामी पालकांचे विनंतीपत्र आवश्यक/
प्रती लाभार्थी रुपये 10000/- |
|
||||||||||
4 |
सिंधुदुर्ग |
प्रा.आ.केंद्रस्तरावर शवविच्छेदक (कटर) यांना प्रोत्साहनपर मानधन ही योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
प्रा.आ.केंद्र ठिकाणी शवविच्छेदन करणा-या शवविच्छेदकाला प्रती शवविच्छेदनामागे रु.1000/- मानधन देणे.
शवविच्छेदक(पुरुष सफाईदार) |
प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रात होणारे अनैसर्गिक मृत्यू ज्याचे शवविच्छेदन करणे आवश्यक आहे अशा शवाबाबत शवविच्छेदनेकाला पुरुष सफाईदार यांना प्रती शवविच्छेदना मागे रु.1000/- / प्रती शवविच्छेदनामागे रु.1000/- |
|
||||||||||
5 |
सिंधुदुर्ग |
सिंधु आरोग्य मेळा ही योजना
|
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
जिल्ह्यातील कॅन्सर,हदयरोग व मधुमेह रुग्णांवर वेळीच निदान व उपचार होणेकरीता तज्ज्ञ डॉक्टरांच्या शिबिरांचे आयोजन करणे. जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय रुग्णालये,प्रा.आ.केंद्र येथे उपचारासाठी येणारे रुग्ण |
प्रत्येकी आरोग्य तपासणी शिबिरासाठी 50,000/- मर्यादीत
प्रत्येक 3 प्रा.आ.केंद्रासाठी 50,000/- प्रमाणे एकूण अनुदान र.रु.1,50,000/-
|
|
||||||||||
6 |
सिंधुदुर्ग |
सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
माघी पायी वारी करणा-या वारकऱ्यांंसाठी आरोग्य विभाग,जि.प.सिंधुदुर्ग मार्फत यावर्षी आंबोली मार्गे जाणा-या वारकऱ्यांसोबत एक रुग्णाहिका व वैभववाडी मार्गे जाणा-या वारकऱ्यांसोबत एक रुग्णाहिका अशा एकूण दोन रुग्णाहिकांचे सोबत वैद्यकीय पथक (यामध्ये वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहा.(पु./म.) आरोग्य सेवक(पु./म.)मदतनीस सेवा पुरविली जाणार आहे.) माघी पायी वारी करणारे वारकरी |
सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट पायी वारी करणारे वैद्यकीय पथकाला आंबोली व वैभववाडी मार्ग प्रत्येकी 50,000/- प्रमाणे
2 पथकासाठी 50,000/- प्रमाणे पायी वारी करणारे वारकऱ्यांसाठी या योजनेंतर्गत एकूण अनुदान-1,00,000/- |
|
||||||||||
7 |
सिंधुदुर्ग |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
पहिले अपत्य (मुलगा / मुलगी) व दुसरे अपत्य मुलगी असलेली महिला योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे. 1.ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु.8 लाख पेक्षा कमी आहे. 2.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला 3.ज्या महिला अंशत: (40%) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन) 4.बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला 5.आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी 6.ई-श्रम कार्ड धारण करणा-या महिला 7.किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी 8.मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला 9.गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/ अंगणवाडी मदतनीस (AWHs)/ आशा कार्यकर्ती (ASHAs). |
1.पहिल्या अपत्यासाठी- पहिला हप्ता- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासुन 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणांची नोंदणी आणि किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी करून घेणे आवश्यक आहे. रु.3000/- दुसरा हप्ता- अ)जन्म नोंदणी प्रमाणपत्र ब)बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, आयपीव्ही आणि हिपॅटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण) करणे आवश्यक आहे. रु.2000/- 2.दुस-या अपत्यासाठी (मुलगी असल्यास)- बाळाच्या जन्मानंतर (जर एखादया लाभार्थीस तिच्या दुस-या गरोदरपणात एकापेक्षा जास्त (जुळे/तिळे/चार) अपत्ये झाली असतील व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर तिला PMMVY 2.0 नियमांनुसार दुस-या मुलीसाठीचा लाभ मिळेल.) एकरकमी रु.6000/-. |
|
||||||||||
8 |
सिंधुदुर्ग |
आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
लाभार्थी - 1.सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011(SECC)मध्ये नोंदविलेली कुटुंबे 2.राष्ट्रिय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) मधील समाविष्ट अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गटातील (PHH)कुटुंबे
|
रु.पाच लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष आरोग्य संरक्षण 34 विशेष सेवांतर्गत 1356 आरोग्य उपचार मोफत |
|
||||||||||
9. |
सिंधुदुर्ग |
माहात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना |
|
|
गट अ ते इ गटसाठी (ड वगळून )रु.पाच लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष आरोग्य संरक्षण 34 विशेष सेवांतर्गत 1356 आरोग्य उपचार मोफत गट ड करिता रु.1 लाख प्रति व्यक्ती प्रति वर्ष रस्ता अपघात रुग्णांसाठी 184 आरोग्य उपचार पॅकेज |
|
||||||||||
10 |
सिंधुदुर्ग |
जननी सुरक्षा योजना |
|
अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती व दारिद्रय रेषेखालील सर्व गर्भवती महिला आवश्यक कागदपत्रे – 1.MCP कार्ड 2. RCH नंबर 3.महिलेचे बँक खातेबुक |
बाळंतपण घरी झाल्यास 500/- रुपये बाळंतपण शासकीय किंवा शासन मान्य मानांकित आरोग्य केंद्रात झाल्यास
|
|
||||||||||
11 |
सिंधुदुर्ग |
आरोग्य दृष्टया ना-हरकत दाखला |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग |
निवासी / वाणिज्य प्रयोजनार्थ जागा अकृषक/रेखांकन(बिनशेती)करणे.
|
1)मागणी अर्ज 2)7/12 उतारा (1 प्रत) 3)8 अ उतारा (1 प्रत) 4)ग्रामपंचायत ना-हरकत दाखला. (1 प्रत) 5)गट बूक नकाशा (1 प्रत) 6)इमारत बांधकाम नकाशा (ब्लु प्रिंट) (1 प्रत) 7)जमिनीतील हितसंबधाचे संमत्तीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र(100 रु.स्टँप पेपर)(1 प्रत) 8)प्रकल्प अहवाल 9)व्यवसायबाबत सांडपाणी,घनकचरा,योग्य विल्हेवाटबाबत हमीपत्र(100 रु.स्टँप पेपर)(1 प्रत) (7/12 मध्ये सहहिस्सेदार असल्यास )
|
|
शिक्षण विभाग प्राथमिक
अ.क्र. | योजनेचे नाव | आवेदन पत्र नमुना |
---|---|---|
1 |
आंतरजिल्हा बदली प्रस्ताव तपासणी सूची | |
2 |
गट विमा अंतिम अदायगी प्रस्ताव तपासणी सूची |
|
3 |
ठेव संलग्न प्रस्ताव तपासणी सूची |
|
4 |
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना . |
|
5 |
प्राथमिक शिक्षक निवड श्रेणी मंजूर करणेबाबत तपासणी सूची |
|
6 |
भविष्य निर्वाह निधी अंतिम अदायगी वर्ग प्रस्ताव तपासणी सूची |
|
7 |
भविष्य निर्वाह निधी अंतिम अदायगी प्रस्ताव तपासणी सूची |
|
8 |
वरिष्ठ वेतनश्रेणी तपासणी सूची |
|
9 |
वैद्यकीय प्रतिकृती प्रस्ताव प्रशासकीय - तांत्रिक मंजुरीसाठी चेकलि |
|
10 |
शाळा इमारत निर्लेखनासाठी सादर करावयाच्या कागदपत्रांची चेक लिस्ट |
|
11 |
सेवा पुस्तक पडताळणी तपासणी सूची |
|
12 |
स्थायित्व प्रमाणपत्र प्रस्ताव तपासणी सूची |
शिक्षण विभाग माध्यमिक
कृषी विभाग
अ.क्र | योजनेचे नाव | आवेदन ओअत्र नमुना |
---|---|---|
१ | बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना | |
२ | हळद लागवड अर्ज नमुना |
महिला बालकल्याण विभाग
बांधकाम विभाग
ग्रामिण पाणी पुरवठा विभाग
लघुपाटबंधारे विभाग
पशुसंवर्धन विभाग
जिल्हा परिषद वाढीव उपकराव्यतिरिक्त अनुदानामधुन राबविण्यात येत असलेल्या योजना
क्र |
योजना नाव |
योजना तपशिल / स्वरुप |
लाभार्थी निकष व जोडावयाची आवश्यक कागदपत्रे |
---|---|---|---|
1 |
अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचा पुरवठा (40% अनुदान) |
कोणत्याही वित्तीय संस्था/बँकेकडून घेतलेल्या रक्कम रूपये-01.00 लक्षच्या मर्यादित कर्जामधून दोन दुधाळ जनावरांचे (संकरीत गाई/देशी गाई/सुधारीत म्हशी) खरेदीकरिता रूपये-30,000/- व 03 वर्षाच्या विम्याकरिता रूपये-10,000/- अनुदान असे एकूण रक्कम रुपये-40,000/- म्हणजे 40% अनुदान संबंधित वित्तीय संस्था/बँकेकडे जि.प.मार्फत अदा करण्यात येणार आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही पशुपालक योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. लाभार्थीने वित्तीय संस्था/बँकेकडून कर्जप्रकरण मंजूर करून घेणे आवश्यक. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे.
|
2 |
75% अनुदानावर 05 शेळया + 01 बोकड यांचा गट पुरवठा करणे |
दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील (वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये-80,000/- चे आतील) लाभार्थीना 75% अनुदानावर 5 शेळया व 1 बोकड यांचा गट पुरवठा करण्यात येतो. शेळीगटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत रक्कम रुपये-40,352/- (बोकड - रुपये-8000/- शेळया - रुपये-30,000/- व विमा- रुपये-2352/-) पैकि 75% अनुदान रक्कम रुपये-30,264/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-10,088/- असा आहे. योजना डिबीटीव्दारे राबविण्यात असल्याने लाभार्थीने प्रथम शेळीगट खरेंदी व गटाचे विमाकरण करणे आवश्यक आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. दा.रे.खालील किंवा अल्प-उत्पन्न गट दाखला जोडावा. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे.
|
3 |
महिला सबलीकरणा साठी 75% अनुदानावर 05 शेळया + 01 बोकड यांचा गट पुरवठा करणे |
दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील (वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये-80,000/- चे आतील), महिला बचतगट सदस्य, विधवा/ परित्यक्त्या महिला लाभार्थीना 75% अनुदानावर 5 शेळया व 1 बोकड यांचा गट पुरवठा करण्यात येतो. शेळी गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत रक्कम रुपये-40,352/- (बोकड- रुपये-8000/- शेळया-रक्कम रुपये-30,000/- व विमा-रक्कम रुपये-2352/-) पैकि 75% अनुदान रक्कम रुपये-30,264/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-10,088/- असा आहे. योजना डिबीटीव्दारे राबविण्यात येणार असल्याने लाभार्थीने प्रथम शेळीगट खरेंदी व गटाचे विमाकरण करणे आवश्यक आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील महिला बचत गटातील सदस्य, विधवा/परित्यक्त्या लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. दा.रे.खालील किंवा अल्प-उत्पन्न गट दाखला, महिला बचत गटातील सदस्य दाखला, विधवा/परित्यक्त्या असल्याबाबतचा विहित प्राधिकरणाचा दाखला जोडावा. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे. |
4 |
महिला सबलीकरणा- साठी 75% अनुदानावर सुधारीत जातीच्या एक दिवसीय 50 कुक्कुट पिलांचा गट व पशु- खाद्याचा पुरवठा करणे |
दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील (वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये-80,000/- चे आतील), महिला बचतगट सदस्य, विधवा/ परित्यक्त्या महिला लाभार्थीना 75% अनुदानावर महिला लाभार्थीना 01 दिवस वयाचे 50 कुक्कुट पक्षाचा एक गट व पशुखाद्य पुरविण्यात येते. प्रकल्पाची एकूण किंमत रूपये-3,000/- (पक्षाची किंमत रुपये-1,000/- + पक्षीखाद्य रक्कम रूपये-2,000/-) पैकी अनुज्ञेय 75% अनुदान रक्कम रुपये-2,250/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-750/- असा राहिल. योजना डिबीटीव्दारे राबविण्यात येणार असल्याने लाभार्थीने 12 आठवड्यांकरिताचे किमान रक्कम रुपये-3000/- चे पक्षीखाद्य प्रथम खरेंदी करणे आवश्यक आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील महिला बचत गटातील सदस्य, विधवा/परित्यक्त्या लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. दा.रे.खालील किंवा अल्प-उत्पन्न गट दाखला, महिला बचत गटातील सदस्य दाखला, विधवा/परित्यक्त्या असल्याबाबतचा विहित प्राधिकरणाचा दाखला जोडावा. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे.
|