बांधकाम विभाग
विभागा विषयी
बांधकाम विभाग
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आठ तालुके असून जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत एकूण पाच उप विभाग कार्यरत आहेत. उप विभाग खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. |
उप विभागाचे नाव |
समाविष्ट तालुके |
---|---|---|
1 |
देवगड |
देवगड |
2 |
कणकवली |
कणकवली, वैभववाडी. |
3 |
मालवण |
मालवण |
4 |
कुडाळ |
कुडाळ, वेंगुर्ला. |
5 |
सावंतवाडी |
सावंतवाडी, दोडामार्ग. |
बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण, अपारंपारीक ऊर्जा विकास, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा, अतिवृष्टी व गारपेठ अंतर्गत कामे, साकव दुरूस्ती, आमदार, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम इत्यादी विकासात्मक योजना राबविण्यात येतात.
बांधकाम विभागाअंतर्गत प्रमुख योजनांमध्ये इतर जिल्हा मार्गांची एकूण लांबी कि.मी. 677.950 एवढी असून कि.मी. 587.300 साध्य करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामीण मार्गांची एकूण लांबी कि.मी. 5198.127 एवढी असून कि.मी. 3362.373 साध्य करण्यात आलेली आहे. उर्वरीत लांबी विविध योजनांतर्गत अनुदानाच्या उपलब्धतेनुसार साध्य करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा पुरविणेची कामे हाती घेतल्याने त्याचा फायदा पर्यटक, भाविक तसेच जिल्ह्यातील जनतेला त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरून येणा-या जनतेला मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच रस्त्यांचे नुतनीकरण व मजबुतीकरणामुळे वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध होत आहे. अपारंपारीक ऊर्जा विकास योजनेमधून सार्वजनिक, धार्मिक व पर्यटन स्थळे प्रकाशमय करण्यात आलेली आहेत व येत आहेत. त्याचा फायदा स्थानिकांबरोबरच सदर ठिकाणी भेट देणारी सर्व जनता, भाविक व पर्यटक यांना होत आहे.
याशिवाय जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत येणारी विकास कामे यामध्ये शाळा इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय दवाखाने इमारतींची बांधकामे व दुरूस्ती इत्यादी कामांच्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकरी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र येथे उपचारासाठी येणारी जनता यांना चांगल्या सेवा देण्यात येत आहेत.
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
सेवाजेष्ठता सूची
Content Will Update Soon
दिल्या जाणाऱ्या सेवा
सर्व महसुली गावे व शहरे रस्त्यांनी जोडण्याचा प्रस्ताव 2001-2021 रस्ते विकास योजनेअंतर्गत अंतर्भूत आहे. तसेच औदयोगिक केंद्रे, तालुक्याची ठिकाणे, व्यापारी महत्त्वाची ठिकाणे, प्रेक्षणीय स्थळे, कृषिप्रधान केंद्रे तसेच चिपी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, फळप्रक्रिया उद्योग, महत्त्वाची गावे ही मुख्य रस्त्यावर असावीत हे मार्गदर्शक तत्व 2001-2021 रस्ते विकास योजनेमध्ये विचारात घेण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनेंतर्गत निधीतून सदर रस्ते टप्प्या - टप्प्याने पूर्ण करणेत येत असून त्यांची देखभाल दुरूस्ती करण्यात येते.
जिल्हयातील पर्यटन स्थळे यामध्ये समुद्र किनारे, तिर्थक्षेत्र, धबधबे, थंड हवेचे ठिकाण, गड किल्ले इत्यादी ठिकाणी मूलभूत सुविधांबरोबरच त्या ठिकाणचा परिसर सुशोभिकरण करण्याची कामे शासनाच्या विविध योजनेंतर्गत निधीतून करण्यात येतात. यामधून जिल्हयात येणारे पर्यटक व भाविक यांना उत्तम प्रकारच्या सेवा, सुविधा व विरंगुळाची साधने निर्माण करून देण्यात येत आहेत.
या योजनेतून जिल्हयातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, सार्वजनिक क्षेत्र / परिसर इत्यादी ठिकाणी लाईट सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. अशी ठिकाणे प्रकाशमय करून पर्यटक, भाविक, स्थानिक जनता यांना त्याचा लाभ देण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाचे बहुतांशी क्षेत्र हे डोंगराळ तसेच दऱ्याखोऱ्या, टेकडी, घाट मार्ग नद्या- नाले व दाट जंगलानी व्यापलेले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी, वादळ, गारपीठ यामुळे जिहयामध्ये मोठया प्रमाणात विविध साधन संपत्तीचे नुकसान होते. ग्रामीण रस्ते व घाट मार्ग वाहूण जाणे, नादुरूस्त होणे यासारखी अनेक आपत्ती निर्माण झाल्याने जनजिवन विस्कळीत होते. तातडीची उपाययोजना म्हणून या योजनेच्या माध्यमातून अशा साधन संपत्तीची नव्याने निर्मिती किंवा डागडुजी करण्यात येऊन जनजिवन सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.
कामवाटप समिती इतिवृत्त / सूचना
अ.क्र. | काम वाटप समिती इतिवृत्त / सूचना | लिंक |
---|---|---|
1 | इतिवृत्त 12/07/2024 | |
2 | सूचना 12/07/2024 | |
3 | इतिवृत्त 04/09/2024 | |
4 | सूचना 04/09/2024 | |
5 | इतिवृत्त 10/12/2024 | |
6 | सूचना 10/12/2024 | |
7 | इतिवृत्त 13/01/2025 | |
8 | सूचना 13/01/2025 | |
9 | इतिवृत्त 13/02/2025 | |
10 | सूचना 13/02/2025 | |
11 | इतिवृत्त 18/03/2025 | |
12 | सूचना 18/03/2025 |